kavyashilp Digital Media

Blogs, News web portal, Digital Marketing

वेबसाईट

1. वेबसाईटची निर्मिती कशासाठी?
कोणत्याही आधुनिक व्यवसायासाठी वेबसाइट महत्वाची असते. जरी आपण स्थानिक पातळीवर किंवा एकमेकांना तोंडी सांगून विक्री करत असलात, तरीही आपले ग्राहक आपल्याला वेबवर शोधत आहेत – जरी ते केवळ तुमचे तास बघत असले तरी. इथे आपल्याला जे हवे आहे ते मिळेल
तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी, ऑनलाईन विक्री, प्रसिद्धीसाठी, वैय्यक्तिक प्रभाव वाढवण्यासाठी अथवा इतर काही उद्देशाने तुम्ही वेबसाईट तयार करुन घेऊ शकता. पण उद्देश निर्मितीपूर्वीच निश्‍चित केल्याने तुम्हाला लागणारा वेळ, खर्च व वेबतंत्रज्ञाचे श्रम (निर्मिती खर्च) वाचवता येतो.

उद्देश – तुमची साधी माहिती देणारी अव्यावसायिक वेबसाईट असेल तर तुमची माहिती रोचक व खिळवणारी आहे का हा विचार करा. जर ती एखाद्या सेवेला किंवा उत्पादनाला प्रसिद्धी देणार असेल तर इतरांपेक्षा काय वेगळी कल्पना लढवता येईल याचा विचार करा. तुमची वेबसाईट सेवा देणारी असेल किंवा विक्री करणार असेल तर तुमच्या उत्पादनांची इत्यंभूत माहिती तुमच्याकडे हवीच पण त्या बरोबर त्यात ऑफर्स कुठल्या देता येतील याचा विचार हवा.आता तुम्ही म्हणाल कि मीच सगळा विचार करायचा आहे तर वेब डेव्हलपर काय करणार आहे?

ग्राहक व वेब तंत्रज्ञ हे दोघे मिळून वेबसाईट बनवत असतात. त्यांच्या एकत्रित काम करण्याने चांगली वेबसाईट तयार होते. तुमची वेबसाईट कशी हवी हे, व्यवसाय करणारा जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. वेबसाईटकडून आपण काय अपेक्षा करत आहोत हे तरी किमान माहित असायला हवेच. तुमचा पैसा, वेळ व तंत्रज्ञांचे श्रम या पूर्व तयारीने नक्कीच वाचेल.

तुमच्या वेबसाईटचा साईटमॅप किंवा वेबसाईट चा अनुक्रम या टप्प्यात ठरला तर अतिउत्तम! साईटमॅप निश्‍चित केल्याने आपल्या वेबसाईटला किती पाने असावीत व त्यात काय माहिती असेल हे निश्‍चित करता येते. त्यावरूनच तुमचे बजेटही काढता येऊ शकते.

2. तुमच्या व्यवसायास साजेसे असे domainname तात्काळ नोंदवा.
डोमेन नावाशिवाय आपल्याकडे वेबसाइट असू शकत नाही. जसा रस्त्याचा पत्ता आपण कुठे राहता हे लोकांना सांगतो तसेच डोमेनमुळे ग्राहक थेट आपल्या वेबसाइटवर जाउन पोचतात.
तुमच्या स्टार्टअप / व्यवसायाच्या नावाला निश्‍चित करण्यापुर्वी त्यानावाचे डोमेन उपलब्ध आहे का? हे जरुर पहा. हा विचार व्यवसाय नोंदणी आधी न केल्याने खूपदा महागडे डोमेन घ्यावे लागू शकते. आकर्षक नावं डोमेन म्हणून बुक करणे व नंतर ती त्या नावांच्या व्यवसायांना चढ्या भावाने विकणे हा एक व्यवसाय आहे जो अधिकृत आहे. त्या मुळे जर तुमच्या आवडीचे डोमेन उपलब्ध असेल तर लगेच बुक करा.

व्यवसायाच्या नावाचे .कॉम डोमेन उपलब्ध नसल्यास तुमच्या सेवांच्या नावांचा शोध घ्या. त्यात व्यवसायाचे नाव घाला, शहराचे नाव घाला व डोमेन विकत घ्या. शक्यतो .com हे व्यवसायाला उत्तम पण .in,.co.in,.org,.net ह्या एक्सटेंशन ने सुद्धा डोमेन बुक करा, हे TLDs सुद्धा सध्या लोकप्रिय आहेत. तुमचा जसा व्यवसाय असेल तशी ही डोमेन एक्स्टेंशन आता मिळतात. उदा. .studio, .club, .academy, .host etc. अशी २०० च्या वर येऊ घातलेली व आत्ता उपलब्ध असलेली एक्सटेंशन आहेत.

3. वेबसाईट ची गरज पाहून होस्टिंग खरेदी करा.
होस्टिंगमुळे तुमची साइट वेबवर दिसते. आम्ही प्रत्येक गरजेसाठी जलद, विश्वसनीय योजना प्रस्तावित करतो – एका मूलभूत ब्लॉगपासून उच्च-सक्षम साइटपर्यंत.
वेबसाईटवर दिवसाला किती माणसे येणे अपेक्षित आहे? तुमच्या माहितीत फोटो, व्हिडीओ, ऑडिओ किती असतील? तुमच्या सेवा दिवसाला किती इमेल्स पाठवतील? अशा अनेक प्रश्‍नांचा अंदाज घ्या. दरवर्षी वेब होस्टिंग व डोमेन नोंदणी यावर किती खर्च करायचा याचा अंदाज घ्या.

होस्टिंग मध्ये विंडोज व लिनक्स असे दोन प्रमुख प्रकार येतात. विंडोज होस्टिंग थोडे महाग पडते पण सुरक्षेबाबत जरा चांगले असते. लिनक्स होस्टिंग जरा स्वस्त पडते, सुरक्षा आपल्याला हव्या त्या पद्धतीने व स्तरावर लावता येते. लिनक्स होस्टिंग त्याच्या लवचिकतेमुळे लोकप्रिय आहे. होस्टिंगची जागा ही mb अथवा gb मधे मोजतात. जितकी जागा जास्त तितके त्याप्रमाणात पॅकेज स्वस्त होत जाते.

साधारणतः तुमच्या वेबसाईटच्या आकाराच्या दुप्पट किंवा अडिच पट जागा घ्यावी म्हणजे 3 वर्षे चिंता नाही. डोमेनबरोबरच होस्टिंग घेण्याची घाई करु नका, वेबतंत्रज्ञाच्या सल्ल्यानेच ती विकत घ्या व त्याच्याकडून डोमेन संलग्न करा. अनेक तांत्रिक कारणांमुळे तुमचे पैसे वाया जाऊ शकतात.

4. तुमच्या व्यवसायाची माहिती गोळा करा व स्वत: संकलित करा.
वेबसाईटमधील हा प्रमुख भाग असतो त्यामुळे तुमच्या व्यवसायाची अतिशय मोजकी, वेधक, मुद्देसूद व खरी माहिती गोळा करा. खालील मुद्दे तुम्हाला मदत करू शकतील.

लोकसहभाग – तुमच्या वेबसाईटवर माहिती लिहिताना प्रथम येणाऱ्या वाचक ग्राहकांबद्द्ल लिहायला हवं. तुमच्या वाचकांचा वयोगट, शहर व आवडी निवडी याचा अंदाज घेतला गेला पाहिजे. किती लोक साधारणपणे एका तासात भेट देतील? त्यांनी वेबसाईटवर काय करणे अपेक्षित आहे? असा विचार करून ते लिहून काढा.
आर्थिक बाजू – तुम्ही वेबसाईट सुरु करताना तुमचे आर्थिक गणित काय आहे ते हि ठरावा, आणि त्या नुसार पुढील आखणी करा. वेबसाईट सुरु करण्यासाठी काही मोफत सेवा उपलब्ध आहेत. त्याचा वापर करायचा कि पूर्ण पणे स्वताची वेबसाईट बनवून गुंतवणूक करायची हे ठरवावं. यात वार्षिक डोमेन, होस्टिंग, इमेल सेवा व व्यवस्थापन याचा किती खर्च येतो हे पहाव.
विषय – व्यवसायाबद्दल / सेवांबद्दल / उत्पादनाबद्दल लिहिताना
तुमचे व्यवसाय सुरु करण्यामागचे विचार, उद्देश लिहा. व्यवसायातील सेवांबद्द्ल लिहा. तुमच्या भाषेत लिहा, लिहून काढल्याने विचार वाढतात आणि आपल्याला उमगत जाते. पुन्हा पुन्हा लिहीलेत तर तुम्ही उत्तम माहिती लिहू शकाल.
समांतर व्यवसायांबद्दल इंटरनेटवर, आजूबाजूला शोध घ्या व त्यांच्या वेबसाईटचा अभ्यास करुन माहिती संकलित करा. ती वाचा त्यांनी मांडलेले मुद्दे व तुमचे यात साम्य काय व वेगळे पण काय आहे ते पहा. spreadsheet मध्ये शेजारी शेजारी लिहून मुद्द्यांची तुलना करा. त्यातील जे मुद्दे तुम्हाला पटतील ते तुमच्या भाषेत लिहा.
तुमचा व्यवसाय जुना असेल तर त्याची सुरुवात वाटचाल व अनुभव यावर भर द्या. नवीन सुरुवात करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्या विचारांवर, केलेल्या अभ्यासावर किंवा व्यवसायाबद्दल काय वाटत यावर भर द्यावा.
माहितीचे स्त्रोत – विविध चित्रे, छायाचित्रे, व्हिडिओ, प्रेझेंटेशन बनवा ती व्यावसायिक वाटावीत म्हणून तुम्ही एखाद्या ग्राफिक डिझायनरला काम देऊन ती करवून घ्या. ज्याचा वापर करुन तुम्ही वेबसाईटला प्रभावी बनवू शकाल.
तुम्हाला भाषेसंदर्भात अडचण येत असल्यास तीच माहिती व्यावसायिक लेखकांकडून ती पुन्हा लिहुन घ्या. ही माहिती जर योग्य पद्धतीने लिहीली असेल तर वेबसाईटचा #SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करताना खूप फायदा होतो.
कदाचित तुमची माहिती फार कमी जण वाचतील अस जरी मानंल तरी ती जो कोणी वाचेल तो तुम्हाला connect झाला पाहिजे अशी ती असावी. त्याशिवाय हि माहिती गुगल १००% वाचणार आहेच, जर ती गुगल ला खरी, खात्रीलायक, एकमेव (unique, genuine) वाटली तर तुमच्या वेबसाईटचे गुण गुगलच्या नियमानुसार वाढतात व तुम्हाला वरचे स्थान गुगल शोध निकालात ( Google search results )मिळते.
5. तुम्हाला योग्य वाटणार्‍या वेबतंत्रज्ञाला काम देऊन वेबसाईट तयार करा.
वेबसाईटवर काम सुरु करण्यापूर्वी तुम्ही आधीच्या पायर्‍या पार केल्या असतील तर वेबतंत्रज्ञाचा /web designer developer चा शोध घ्या. जर काम मोठे वाटत असेल तर एखादी वेब एजन्सी शोधा. किमान 4-5 quotations मागवा.

आपल्याला माहीतच आहे की, काव्यशिल्प डिजिटल मीडिया या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देत आहे.

निर्णय घेताना मूल्याबरोबरच वेबतंत्रज्ञाचे कौशल्य, वेळ, तंत्रज्ञान व त्यातून मिळणार्‍या सेवा यांची तुलना करा. वेबतंत्रज्ञाशी मोकळेपणाने व स्पष्टपणे तुमच्या सर्व अटी, अपेक्षा बोला. तुमचे काम चालू असे पर्यंत त्याच्याशी संपर्कात राहून त्याचे काम सोपे होईल असे पहा.

माझ्या अनुभवातून आलेले हे मुद्दे तुम्हाला नक्कीच वेबसाईट बनवायच्या प्रक्रियेत उपयोगी पडतील अशी खात्री आहे. यात अनेक पैलू हि आहेत. येणाऱ्या काही लेखात ते हि मांडेन. तुमच्या प्रतिक्रिया व प्रश्न मला विचारायला काही हरकत नाही.

वेब सुरक्षा
तुमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी, तुम्ही ग्राहकांना वायरस, हॅकर्स आणि त्यांची ओळख चोरणाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण कराल यावर त्यांचा विश्वास असणे आवश्यक आहे. तुमची वेबसाइट सुरक्षित, तुमच्या अभ्यागतांना संरक्षित आणि तुमच्या व्यवसायाची प्रगती सुरू ठेवण्यासाठी आमच्या सुरक्षा उत्पादनांवर विश्वास ठेवा.

Deonath Gandate

Blog | Webpage

MillionDollarGirl❤️

Travel, Relationship and many more things...

काय वाटेल ते........

महेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग........

मराठी टेक Marathi Tech

तंत्रज्ञानातल्या नवीन बातम्या आणि काही मदती. मिळवा दररोज नवीन

मैत्री २०१२

आपली सर्वांची अनुदिनी

रानमोगरा

माझी वाङ्मयशेती

वसुधालय

आपले स्वागत आहे!

धडक कामगार युनियन

Dhadak Kamgar Union, Works in Mumbai & All Over Maharashtra

Naught That Matters

Conversation with oneself!

मेघराज पाटील

मधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ।

Kpramod's Weblog

Just another WordPress.com weblog

4thoughts's Weblog

Just another WordPress.com weblog

Vandana khare's Blog

Just another WordPress.com weblog

Rajivcshah's Blog

Just another WordPress.com weblog

Arunrasaal's Blog

Just another WordPress.com site

कर्मभूमि

मेरा समाज, मेरे लोग, और मेरे विचार